For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

04:11 PM Mar 20, 2025 IST | Pooja Marathe
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
Advertisement

मुंबई

Advertisement

महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

२५ लाख रोख रक्कम, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिल्पकार राम सुतार हे १०० वर्षांच्या वयातही शिल्पकलेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. सध्या इंदू मिल येथे निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील शिल्प तयार करण्याचे कार्यही, शिल्पकार सुतार करत आहेत.

Advertisement

१२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत शिल्पकार सुतार यांचे अद्वितीय असे योगदान लक्षात घेऊन त्यांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.