For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव

11:31 AM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव
Advertisement

26,27 रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

कट्टा /वार्ताहर
मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील परमपूज्य राणे महाराज यांच्या मठात गुरुवार 26 मार्च रोजी रामनवमी उत्सव व शुक्रवार 27 मार्च रोजी राणे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी रामनवमी निमित्ताने 26 मार्च रोजी सकाळी 9 वा. मूर्ती अभिषेक, 10 वा. रामजन्माचे कीर्तन, दु. 12 वा. रामजन्म, 1 वा. महाआरती, 1.30 वा. अखंड महाप्रसाद, 3 वा. हरिपाठ, सायं. 7 वा. बुवा श्री अजित गोसावी यांचे सुश्राव्य भजन, रात्री 8 वा. बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री यांचे सुश्राव्य भजन. प. पु. राणे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 27 मार्च रोजी सकाळी 9 वा. राणे महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, 10 वा. रामनाम जप व हरिपाठ, दु. 1 वा. महाआरती, 1.30 वा. अखंड महाप्रसाद, सायं. 4 वा. प. पू. नामदेव महाराज भक्त मंडळी यांचा हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम, 4.30 वा. पालखी मिरवणूक कै. गुरुनाथ म्हाडगुत कट्टा यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठ पर्यंत, रात्री ठीक 8 वा. श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, किनळोस यांचे वारकरी भजन असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.