राम मंदिर प्रतिकृती-नाण्यांची पोतदार ज्वेलर्सकडून निर्मिती
बेळगाव : प्रभू रामचंद्रांचे अयोध्या येथे भव्यदिव्य असे मंदिर उभारले जात आहे. प्रत्यक्षपणे या सोहळ्याला उपस्थिती दर्शविता आली नसली तरी राम मंदिराची एक आठवण आपल्याकडे असावी म्हणून पोतदार ज्वेलर्सने राम मंदिराची प्रतिकृती तसेच राम मंदिराची प्रतिमा असलेली नाणी तयार केली आहेत. अतिशय बारीक कलाकुसर करून चांदीमध्ये सुबक राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून याला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. पोतदार ज्वेलर्सने 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 व 100 ग्रॅम वजनामध्ये राम मंदिराची प्रतिमा असलेली नाणी तयार केली आहेत. तर 250 ते 1200 ग्रॅम वजनामध्ये चांदीची राम मंदिराची प्रतिकृती बनविली आहे. नेहमीच नाविन्य जपणाऱ्या पोतदार ज्वेलर्सने राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या प्रतिकृती व नाणी विक्रीसाठी बाजारात आणली आहेत. याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
राम मंदिराची सुबक प्रतिकृती
भेट देण्यासाठी तसेच आपल्याकडे संग्रहित राहावी, अशी राम मंदिराची प्रतिकृती बनविण्याची मागणी ग्राहकांमधून होत होती. या मागणीनुसार आमच्या कारागिरांनी सुबक प्रतिकृती तयार केली आहे. चांदीची लहान नाणी तयार केली असून त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे रंगीत फोटो तसेच राम मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली आहे, असे पोतदार ज्वेलर्सचे संजय पोतदार यांनी सांगितले.