For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | राम मंदिर चौक हादरला! क्षुल्लक वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

05:11 PM Apr 19, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   राम मंदिर चौक हादरला  क्षुल्लक वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार  तरुण रक्ताच्या थारोळ्यात
Advertisement

                   सांगलीत मध्यरात्री गोळीबार

Advertisement

सांगली : शहरातील राम मंदिरचौक परिसरातील पंचमुखी मारुती रस्ता शुक्रवारी मध्यरात्री अक्षरशः गोळीबाराने दणाणून गेला. साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल पोतदार याने गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात निलेश जाधव (२९) हा गंभीर जखमी झाला. गोळी त्याच्या गुडघ्याखाली लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

वाढदिवसावरून वाद
धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना एका क्षुल्लक कारणावरूनघडली. टोल्या पोतदारच्या मुलाच्या वाढदिवसाला अजय माने आला नव्हता. याच कारणावरून मध्यरात्री जोरदार वाद रंगला. वाद इतका टोकाला गेला की 'जिवंत सोडणार नाही' अशी उघड धमकी देण्यात आली.

Advertisement

क्षणात वातावरण पेटले

दिलावर जमादारने कंबरेलालावलेले पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली, तर हातात कोयता घेऊन तो पुढे सरसावला. त्याचवेळी टोल्याने अजय मानेच्या दिशेने पिस्तुल रोखले.

सांगलीत गुन्हेगारीचा थरार, नागरिकांमध्ये भीती
भरवस्तीत झालेल्या या गोळीबाराने सांगलीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातत्याने घडणारे खून, खुनी हल्ले आणि आता गोळीबार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
लावलेले पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली, तर हातात कोयता घेऊन तो पुढे सरसावला. त्याचवेळी टोल्याने अजय मानेच्या दिशेने पिस्तूल रोखले.

बचावासाठी गेलेल्या युवकावर गोळी
अजय मानेला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या निलेश जाधववर टोल्याने थेट गोळीबार केला. गोळी लागून जाधव खाली कोसळताच तिघा संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनास्थळी मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. शहर पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, एलसीबी पथकासह वरिष्ठ अधिकायांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला. टोल्या पोतदार, दिलावर जमादार आणि सुधीर उर्फ कांच्या माळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :

.