For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा रामेश्वर मंदिरात उद्या रामजन्म सोहळा

12:16 PM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आचरा रामेश्वर मंदिरात उद्या रामजन्म सोहळा
Advertisement

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

Advertisement

आचरा प्रतिनिधी
संस्थानी थाटाकरीता प्रसिद्ध असणाऱ्या आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव गुरुवारी दि. 26 एप्रिल रोजी शाही  थाटात साजरा होणार आहे. अकरा दिवस  चालणाऱ्या या उत्सवानिमित्त रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दिमाखात पार पाडण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहणार आहेत.या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर येथील श्री रामेश्वर भक्तगण आचरे येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गुढीपाडव्या पासून रामेश्वर मंदिरात भक्तांची रिघ लागली होती. गुढीपाडवा ते लळीतापर्यंत अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रघुपती मुर्तीची पूजा, रोज दुपारी रघुपतीची आरती, सायंकाळी दरबारी प्रख्यात गायकांचा गायनाचा कार्यक्रम व रात्री उशिरा शाही लवाजम्यासह पालखी मिरवणूक सोहळा व कीर्तन होणार आहे.

विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी

गुरुवार दि. २६ मार्च रामनवमी रामजन्माचे कीर्तन - श्री. मिलिंद बवा कुळकर्णी (रामदासी) (सांगली) "श्रीराम जन्म", सायंकाळी ०६.०० वा. गायक- पं.श्री. गिरीश संझगिरी (मुंबई) संवादिनी- श्री. सिद्धेश ठक्कर तबला साथ- पं. श्री. गिरीश नलावडे, शुक्रवार दि. २७ मार्च रोजी सकाळी १०.०० वा. गायन स्थानिक गायक कलाकार, साय. ०६.०० वा. गायिका कु. निधी घारे (पुणे) संवादिनी- श्री. सुशील गद्रे, तबला वादक अभिनव जोशी,पखवाज- गणेश मेस्त्री, तालवाद्य हर्ष बोंडाळे, शनिवार दि. २८ मार्च सकाळी १०.०० वा. गायन स्थानिक गायक कलाकार सायं. ०६.०० वा. गायन स्थानिक गायक कलाकार, तसेच "श्रीं" च्या महापूजेनंतर स्थानिक भजने व रात्रौ लळीत बुधवार दि. ०१ एप्रिल रात्रौ ०९.४५ वा. कै.ग. दि. माडगूळकर रचित आणि कै. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणावर आधारित 'स्पर्धा पुरस्कार' सोहळा मन है राम रंगी रंगले, पहाटे पालखी नंतर हनुमान जन्माचे कीर्तन-श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) (सांगली) तरी या  रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी व सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.