राम गोपाल वर्मांनी केली बॉलीवूडच्या निर्मात्यांवर टीका
साऊथच्या दिग्दर्शकांना कदाचित इंग्रजी येत नसेल पण ते मातीशी जुळलेले सर्जनशील असतात- वर्मा
नवी दिल्ली
'अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2- द रुल' या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मागे टाकत विक्रमी यश मिळवलेले आहे. अशातच दिग्दर्शक 'राम गोपाल वर्मा' यांनी अल्लु अर्जूनच्या 'पुष्पा' हा सिनेमा 'उत्तरेकडील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार नाही. उलट येथील प्रेक्षक या सिनेमावर उल्टी करतील' असे भाकीत करणाऱ्या बॉलीवूडच्या निर्मात्यांवर सडकून टिका केली आहे.
चित्रपट दिग्दर्शक 'राम गोपाल वर्मा' यांनी अलीकडेच भारतीय चित्रपट उद्योगाच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि भारतीय स्तरावरील होणाऱ्या उदयांबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी अल्लू अर्जुन च्या 'पुष्पा' चित्रपटाच्या पहिल्या भागावर कठोर टीका करणाऱ्या एका प्रख्यात बॉलीवूड चित्रपटांच्या निर्मात्यावरही टीका केली.
या निर्मात्याने पुष्षा या सिनेमाच्या पहिल्या भागाबद्दल "उत्तरेकडील प्रेक्षक या माणसाच्या चेहऱ्यावर उल्टी (प्यूक) करतील." असे वक्तव्य केले होते. पुढे तो म्हणाला, उत्तरेकडील प्रेक्षक या माणसाच्या चेहऱ्यावर रागावतील'. पण या सिनेमाच्या यशामागे पैशाचा काही संबंध नाही. लोकांना त्या पात्राशी भावनिक जवळीकता वाटते. (निर्मात्याला) सिक्स-पॅक असलेला, अतिशय देखणी माणसं आवडतात. आता पुष्पा १ आणि २ च्या यशानंतर त्याला भयानक स्वप्नं पडत असतील." असे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले.
पुढे बोलताना 'राम गोपाल वर्मा' म्हणाले, अनेक हिंदी चित्रपट निर्माते हे वांद्रे या परिक्षेत्रापुरतेच मर्यादित आहेत, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता मर्यादित आहे. अनेक दक्षिण भारतीय दिग्दर्शक, ज्यांचे त्यांनी नाव घेतले नाहीत, ते बहुतेकदा इंग्रजीमध्ये अस्खलित नसतात पण त्यांच्या सांस्कृतिक वातावरणाशी खोलवर रुजलेलेही असतात. हे दिग्दर्शक जनतेशी जोडलेले असतात. बहुतेक दक्षिणेकडील दिग्दर्शकांना इंग्रजी बोलताही येत नाही. इंग्रजी हे मूलभूत आहे, तरी ते खूप रुजलेले आणि जोडलेले आहेत. ते बौद्धिकरित्या बोलत नाहीत. पण ते मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांशी जोडलेले आहेत, जे मला वाटते की, बॉलीवूड दिग्दर्शकासाठी अशक्य आहे."
पुष्पा चित्रपटाने जगभरातून प्रचंड मोठं यश प्राप्त केलं आहे. जगभरातून २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या सिनेमाने केली आहे. पुष्पा २ ने अलीकडेच बाहुबली २: द कन्क्लुजन या सिनेमाच्या रेकॉर्डला मागे टाकून दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून स्थान मिळवले आहे.