महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राम चरण अन् समांथा एकत्र झळकणार

06:33 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुकुमार करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

Advertisement

राम चरण सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’च्या कार्यात व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले आहे. याचबरोबर राम चरण हा दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांच्या चित्रपटातही दिसून येणार आहे. परंतु अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही, परंतु याला आरसी16 असे संबोधिण्यात येत आहे.

Advertisement

आरसी16 या चित्रपटात राम चरणसोबत समांथा रुथ प्रभू महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. राम चरण आणि समांथा यांनी यापूर्वी एका चित्रपटात एकत्र काम केले होते. 2018 मध्ये प्रदर्शित ‘रंगस्थलम’ या चित्रपटात ते दिसून आले होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते. सुकुमार यांनीच पुष्पा या चित्रपटाचे दिग्दर्शन पेले आहे.

आरसी16 हा एक ग्रामीण क्रीडाविश्वावर आधारित चित्रपट असणार आहे. कब•ाrवर हा चित्रपट बेतलेला असू शकतो. राम चरणसोबत अभिनेता शिवा राजकुमार देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभणार आहे. केवळ समांथाच नव्हे तर सई पल्ल्वी आणि विजय सेतुपति देखील या चित्रपटात दिसून येऊ शकतात.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article