कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ कोल्हापुरात मेळावा...

05:32 PM Mar 08, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तिपीठ महामार्ग सुरु करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र याला कोल्हापूरसह महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यातून जोरदार विरोध सुरु आहे. सध्या या महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याचं सरकारकडून बोलल जात असल तरी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि गोपीचंद पडळकर आज कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यास कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. यामुळे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती विरुद्ध समर्थक समिती असा सामना पहायला मिळत आहे.

Advertisement

महाराष्ट्राची प्रगती आणि उन्नती करणारा शक्तीपीठ महामार्ग आहे. १४ जिल्ह्यातून हा महामार्ग जातो. परंतु कोल्हापूरात या महामार्गाला विरोध असल्याचे काही मंडळी भासवते होते. म्हणून आज शक्तीपीठ महामार्गामधील बाधीत शेतकऱ्यांनी आज मेळावा घेऊन समर्थन दर्शविलेले आहे. सर्व बाधीत शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहीजे, जेणेकरून ते पुढच्या पिढीला स्थिर सारव करू शकतील अशी प्रमुख मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना या बाधीत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्याना दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उच्चांकी दर शेतकऱ्यांना देऊ अशी ग्वाही दिली आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये विरोधकांकडे मुद्दा नसल्याने त्यांनी आंदोलनाचा हा मुद्दा उपस्थित केला. एक हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सह्यांचे निवेदन, मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे. याप्रसंगी दोनशहून अधिक शेतकरी उपस्थिती दर्शवून समर्थन दिले. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न होता बाजारभावाप्रमाणे जमीनीचा दर देण्याची शासनाचीही भूमिका आहे. महामार्गाचा त्या त्या ठिकाणातील शेतकऱ्याना फायदाच होतो. अनेक फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्ग हा गरजेचा आहे. विरोध करणाऱ्यांनी आजवर विकासात्मक कार्य काहीही केलेले नाही. असे प्रतिपादन आमदार क्षीरसागर यांनी केले.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article