‘पती पत्नी और वो 2’मध्ये रकुल प्रीत
अभिनेता आयुष्मान खुरानाच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘पती पत्नी और वो 2’ आहे. ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये तिसऱ्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. ही तिसरी अभिनेत्री आयुष्मानसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसून येणार आहे. आयुष्मानचा आगामी हा चित्रपट 2019 साली कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पती पत्नी और वो’चा सीक्वेल आहे. अशा स्थितीत निर्मात्यांनी आता सीक्वेलमध्ये 2 नव्या चेहऱ्यांना सामील केले आहे. मुख्य भूमिकेत आयुष्मान दिसून येईल, तर वामिका गब्बी आणि सारा अली खान या अभिनेत्रींची निवड झाली आहे. ‘पती पत्नी और वो 2’ चित्रपटात रकुल प्रीत सिंहही दिसून येणार आहे. रकुलच्या या एंट्रीमुळे या विनोदी चित्रपटात आता तीन-तीन प्रेमकहाण्या पडद्यावर सादर केल्या जाणार असल्याचे मानले जात आहे. रकुल आणि आयुष्मान हे यापूर्वी ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात एकत्र दिसून आले होते. ‘पती पत्नी और वो 2’ हा चित्रपट पुढील वर्षात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.