भाजप महिला मोर्चातर्फे मंत्रालयात रक्षाबंधन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आयुष्यासाठी केली प्रार्थना
पणजी : राज्यात नारळी पौर्णिमा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पर्वरी येथील मंत्रालयात राज्यातील विविध शाळांच्या विद्यार्थिनी, शिक्षक यांनी तसेच भाजप महिला मोर्चातर्फे रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राखी बांधून त्यांना उदंड आयुष्य लाभो, राज्याचे कणखर नेतृत्व सुरक्षित राहो, याविषयी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांची ओवाळणी केली. भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ. हेमांगी गोलतकर व अन्य अनेक महिलांनी भाग घेऊन मुख्यमंत्री सावंत यांना राखी बांधलीं. मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व उपस्थित विद्यार्थिनी व भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांशी संवाद साधत आपण कोणत्याही परिस्थितीत आपले प्रेम व भावना ह्या विसरणार नसल्याचे सांगितले. रक्षा बंधनाच्या पवित्र दिनी आपल्याकडून मिळालेला आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोठा असून, आपण भारावून गेलो आहे. राज्यातील प्रत्येक बहीण सुरक्षित रहावी, यासाठी सरकारमार्फत संरक्षण दिले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील प्रत्येक महिला ही स्वाभिमानी असून, राज्याच्या विकासात महिलांचा फार मोठा वाटा असल्याने त्याचा मला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.