For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटी प्रवासात रक्षाबंधनाचा अनोखा स्नेहबंध; चालकाला बांधली राखी; प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या चालकाप्रती अंगणवाडी सेविकेची कृतज्ञता

एसटी प्रवासात रक्षाबंधनाचा अनोखा स्नेहबंध  चालकाला बांधली राखी  प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या चालकाप्रती अंगणवाडी सेविकेची कृतज्ञता
Advertisement

ओटवणे / प्रतिनिधी : रक्षाबंधनाचा सण शुक्रवारी सावंतवाडी-ओरोस एसटी बसच्या प्रवासात अनोख्या आपुलकीने साजरा करण्यात आला. प्रवाशांना दररोज सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचविणाऱ्या एसटी चालकाला अंगणवाडी सेविकेने राखी बांधून भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधाला अनोखा अर्थ दिला.

Advertisement

सावंतवाडी-ओरोस व्हाया वर्दे, बोरभाटवाडी मार्गावरील बसमध्ये एसटी चालक व्ही. एस. गवस हे आपले कर्तव्य बजावत असताना अंगणवाडी सेविका सौ. परब यांनी त्यांना स्नेहाची राखी बांधली. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास घडवून आणणाऱ्या चालकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम केला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र जबाबदारी पार पाडणाऱ्या एसटी चालकाच्या मनगटावर राखी बांधत सौ. परब यांनी आपुलकीचा आणि विश्वासाचा संदेश दिला. या प्रसंगामुळे बसमधील वातावरणही भावनिक झाले.

Advertisement

‘ममतेचा धागा, सुरक्षिततेचा विश्वास’ या भावनेतून साजरा झालेल्या या रक्षाबंधन सोहळ्यात चालकाच्या पाठीशी बहिणीचे आशीर्वाद आणि आपुलकीचे हात असल्याचा सुंदर अनुभव प्रवाशांना आला. या अनोख्या उपक्रमाचे प्रवाशांकडूनही कौतुक करण्यात आले.

Advertisement
Tags :

.