राखी सावंत चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर
पाकिस्तानी अभिनेत्याकड़ून लग्नासाठी प्रपोजल
मुंबई
बोल्ड अॅण्ड बिनधास्त राखी सावंतला पाकिस्तानी अभिनेता आणि पोलिस दोडी खान यांने लग्नासाठी प्रपोज केले आहे. राखी सावंत जेव्हा पाकिस्तानमध्ये गेली होती, या ट्रीपमध्ये हे घडल्याचेही तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले.
याबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी पाकिस्तानी अभिनेता आणि पोलिस ऑफीसर यांच्या लग्नाच्या मागणीचा विचार केला आहे. यावेळी तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या लग्नाच्या विदारक अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी ती म्हणाली, मला किती त्रास झाला आहे हे लोकांनी पाहिले आहे. माझ्या दुखात माझे पाकिस्तान मधील अनेक फॅन्स सहभागी झाले आहे. मला माझ्या फॅन्सी खूप सपोर्ट केला आहे. त्यामुळे यामुळे जर मला लग्नाची एखादी मागणी आली, तर मी नक्की त्याचा विचार करेन.
ती पुढे म्हणाली, मी आणि दोडी खान आम्ही लग्न करत आहोत. आमचे लग्न पाकिस्तानमध्ये मुस्लिम पद्धतीने होईल, तर इंडियामध्ये लग्नाचे रिसेपशन होईल. यानंतर आम्ही स्विझर्लंड आणि नेदरलॅण्ड ला हानीमूनसाठी जाऊ. आणि दुबईमध्ये सेटल होऊ.
माझे भारतासोबत पाकिस्तानमध्येही खूप फॅन्स आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता आणि समजूत राहू दे असेही पुढे बोलताना राखी सावंत म्हणाली.