महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी यांना विद्यार्थ्यांची राखी

06:22 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशभरात रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या निवासस्थानी विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली. शालेय विद्यार्थिनींच्या एका गटाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन रक्षाबंधन केले. त्यापूर्वी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासियांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या. बंधू आणि भगिनी यांच्यातील प्रेमाचे प्रतीक असणारा हा सण आपल्या सर्वांना सुखदायी होवो. बंधूभगिनींच्या नात्यात हा सण नवा गोडवा निर्माण करो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष राखी साकारली होती. ती बांधून घेतल्यानंतर त्यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यांची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे या विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त केला. अनेक विद्यार्थिनींनी त्यांना हस्तनिर्मित विशेष राख्या बांधल्या.

देशभरात अमाप उत्साह

रक्षाबंधनाचा सण सोमवारी देशभरात आणि विदेशांमध्येही अमाप उत्साहात साजरा करण्यात आला आहे. घरोघरी बहिणींनी आपल्या भावांना ओवाळले आणि त्यांना राखी बांधली. भावांनीही बहिणींना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊन त्यांच्या आनंदात आणखी भर टाकली. बहिणींनी भावांसाठी गोडाधोडाचे पदार्थ करुन त्यांचे तोंड गोड केले. यावेळी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक उत्साहात हा सण साजरा करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

महानगरांसह खेडोपाड्यांमध्ये...

देशभरात सर्व महानगरे आणि छोट्या शहरांसह ग्रामीण भागांमध्येही हा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. प्रत्येक राज्यात तेथील परंपरेनुसार आणि प्रथांनुसार तो साजरा करण्यात आला. यंदा या सणाची उलाढाल 12 हजार कोटी रुपये इतकी झाली असून तो आजवरचा विक्रम असल्याचे प्रतिपादन अनेक संस्थांनी पेले आहे. यावेळी राखी खरेदी करणाऱ्या भगिनी आणि व्यापारी या दोघांनीही चीनी राख्यांना पूर्णपणे फाटा दिल्याचे उत्साहवर्धक दृष्य दिसून आले. यंदाचा हा रक्षाबंधनाचा सण स्वदेशी आणि आत्मनिर्भर वातावरणात साजरा झाला, असे स्पष्टपणे दिसून आले आहे. ही विशेष आनंदाची बाब मानण्यात येत आहे.

हिंदू धर्मात मानाचे स्थान

रक्षाबंधनाचा सण प्राचीन काळापासूनचा असून त्याला हिंदू धर्मात विशेष मानाचे स्थान आहे. या सणाचे संदर्भ प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्येही आढळतात. केवळ भगिनीच नव्हे, तर बंधूही एकमेकांना राख्या बांधतात अशी प्रथाही आहे. संपूर्ण समाजात एकतेचे दृढ बंधन निर्माण व्हावे, हा या सणाचा मुख्य हेतू आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article