सीतारामचा खून उघड होण्याच्या भीतीने राकेशचा खात्मा
रत्नागिरी :
प्रेयसी भक्ती मयेकर हिला सातत्याने फोन करून सीताराम लक्ष्मण वीर (55, ऱा कळझोंडी लोहारवाडी-रत्नागिरी) हा त्रास देत असल्याच्या रागातून दुर्वास पाटील याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्याला सायली बारमध्ये जबर मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला होता. मात्र या खुनाची वाच्यता पुढे साथीदार राकेश जंगम याच्याकडून होऊ शकेल, या भितीपोटी त्याचाही काटा दुर्वासने काढल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
सीताराम वीर याच्या खूनप्रकरणी दुर्वास दर्शन पाटील (28, ऱा वाटद खंडाळा) विश्वास विजय पवार (41, ऱा कळझोंडी बौद्धवाडी रत्नागिरी) व मयत राकेश अशोक जंगम (28, ऱा वाटद खंडाळा, रत्नागिरी) या तिघांविरोधात जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीताराम याच्या खूनामध्ये सहभागी असलेल्या राकेश जंगम याला दाऊचे व्यसन होत़े दाऊच्या नशेत तो सीताराम याचा खून केल्याचे उघड करेल, अशी भिती दुर्वास याच्या मनात होत़ी यातूनच दुर्वास याने राकेश याचा काटा काढण्याचा कट रचला.
- बारमध्ये आला असता सीतारामला बेदम मारहाण
दुर्वास याचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध आहेत हे सीतारामला समजले होत़े सीतारामने भक्तीशी ओळख वाढविण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळविल़ा यानंतर सीताराम हा भक्ती हिला सातत्याने फोन करत होत़ा ही बाब दुर्वास याला समजताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात केल़ी त्यानंतर त्याने सीतारामचा खून केला. सीताराम याला दाऊचे व्यसन होते व तो दुर्वास याच्या मालकीच्या सायली बार येथे दाऊ पिण्यासाठी येत अस़े 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी सीताराम हा दुर्वास याच्या खंडाळा येथील सायली बारमध्ये दाऊ पिण्यासाठी आला होत़ा सीताराम याला पाहताच दुर्वास हा रागाने लालबुंद झाल़ा यावेळी दुर्वासने त्याचा साथीदार विश्वास व राकेश याच्या मदतीने सीताराम याला काठीने, हाताच्या थापटाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल़ी यात सीतारामला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडल़ा मारहाणीत सीताराम याचा मृत्यू झाला असल्याचे दुर्वासला समजले होत़े यावेळी काय करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिल़ा यातून काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय तिघाही संशयितांनी घेतल़ा
- चक्कर येवून पडल्याचा केला कांगावा
मारहाणीत मृत्यू झालेल्या सीतारामला दुर्वास आपल्या कारमधून त्याच्या घरी घेऊन गेल़ा सीतारामला दाऊ पित असताना अचानक चक्कर आली अन् तो बेशुद्ध झाल़ा अशी कथा दुर्वास याने सीतारामच्या नातेवाईकांना सांगितल़ी दुर्वासच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवल़ा तसेच सीतारामच्या उपचारासाठी डॉक्टरला घरी बोलावल़े घरी आलेल्या डॉक्टरने सीताराम मृत झाल्याचे सांगितल़े यावेळी नातेवाईकांनी पोलिसात खबर न देता सीतारामचा अत्यंविधी उरकून घेतल़ा आणि हीच बाब दुर्वासच्या पथ्यावर पडली व या घटनेची खबर पोलिसांना मिळाली नाह़ी
- खूनाचा प्रकार उघड होण्याची दुर्वास याला भिती
सीतारामचा मृत्यू मारहाणीतून झाला आहे ही बाब दुर्वास, विश्वास व वेटर राकेश यांना माहिती होत़ी विश्वास हा दुर्वासचा विश्वासू साथीदार होता. मात्र राकेशला दाऊचे व्यसन होत़े दाऊच्या नशेत तो सीतारामचा खून केल्याचे कुणाजवळ तरी उघड करेल़ अशी भिती दुर्वास याच्या मनात सतावत होत़ी यातूनच दुर्वास याने राकेश याचा काटा काढण्याचा इरादा केल़ा
- अमावस्या हेऊन राकेश जंगमचा केला खून
राकेश जंगम याचा खून करण्याचा कट सायली बारमध्ये रचण्यात आल़ा त्यासाठी 6 जून 2024 ची अमावस्येची रात्र निवडण्यात आल़ी या दिवशी दुर्वास याने आपल्याला कोल्हापूर येथे जायचे असल्याचे राकेश याला सांगितल़े ठरल्याप्रमाणे दुर्वास याच्या सियाज कारमधून राकेश जंगम, नीलेश भिंगर्डे, विश्वास पवार व दुर्वास हे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघाल़े रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गाडी आंबा घाटात पोहचताच राकेश याचा गळा आवळून खून करण्यात आल़ा तसेच त्याचा मृतदेह आंबा घाटातून खोल दरीत फेकण्यात आल़ा
- बेपत्ता तपासात जयगड पोलिसांचा हलगर्जीपणा
राकेश हा बेपत्ता झाला असल्याची तक्रार 21 जून 2024 रोजी जयगड पोलिसात दाखल करण्यात आली होत़ी राकेश हा दुर्वास याच्याकडे वेटरचे काम करत होत़ा तसेच तो दुर्वास याच्यासोबत कोल्हापूरकडे जाणार आहे अशी माहिती असताना त्यासंबंधीचा तपास का करण्यात आला नाह़ी वर्षभरात जयगड पोलिसांनी नेमके काय केले? त्याचप्रमाणे सीताराम वीर याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी परस्पर अत्यंसंस्कार केल़े यासंबंधी पोलिसांना कोणतीच कशी माहिती मिळाली नाही असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आह़े पोलीस या प्रकरणांच्या मुळाशी गेले असते तर पुढे भक्ती मयेकरचा बळी गेला नसता अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहेत.
- भक्तीच्या पोटातील बाळाचा जीव घेण्याचे दुर्वासने केले पाप
सिरियल किलर दुर्वास याच्यावर आतापर्यंत तीन जणांचा खून केल्याचा गुन्हा जयगड पोलिसात दाखल केला आह़े मात्र दुर्वास याने प्रेयसी भक्ती मयेकर हिचा खून करताना तिच्या पोटात असणाऱ्या बाळालाही जन्म घेण्याअगोदर जीव घेतल़ा कोणताही अपराध नसताना त्या निष्पाप जीवाला संपविण्याचे कृत्य क्रूरकर्मा दुर्वासने केले. दुर्वास याने एकप्रकारे केलेला हा चौथा खून ठरला आह़े