महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नेहमी 'सत्याचाच विजय'; आपचे खासदार संजय सिंह यांच्या जामिनानंतर आपची प्रतिक्रिया

05:49 PM Apr 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
MP Sanjay Singh
Advertisement

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात तुरुंगात असलेले राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आज जामीन मंजूर झाला आहे. खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाल्यानंतर नेहमी सत्त्याचाच विजय होतो अशा आशयाची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे.

Advertisement

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना आज अखेर जामीन मंजूर झाला. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे स्वता याच प्रकरणात ईडीच्या आरोपानंतर अटकेत असल्याने खासदार संजय सिंह यांच्या या सुटकेनंतर आपच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या आदेशानंतर लगेचच पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी , “21 मार्च हा मोठा दिवस होता आणि त्या दिवसापासून गोष्टी बदलू लागल्या. आज 2 एप्रिल रोजी 'आप'ची या संकटातूनही सुटका झाली आहे. आज, सर्वोच्च न्यायालयाने खासदार संजय सिंगच्या जामीन याचिकेवर सुनावणी केली आहे. न्यायाधीशांनी स्वतः केंद्राला आणि ईडीला काही प्रश्न विचारले, पण या प्रश्नाची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती,” असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
Delhi Excise Policy caseMP Sanjay SinghRajya Sabha
Next Article