For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध

07:00 AM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध
Advertisement

मल्लिकार्जुन खर्गेंसह काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा

Advertisement

बेंगळूर : कर्नाटक विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होणार होती. मात्र, चार जागांसाठी चारच उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेसचे तीन आणि भाजपचा एक उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आला आहे. गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे मुख्य सचिव मन्सूर अली खान, काँग्रेसच्या प्रसारमाध्य विभागाचे प्रमुख पवन खेरा तसेच भाजपचे प्रा. एम. नागराज यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.

राज्यसभेचे सदस्य भाजपचे इराण्णा कडाडी, नारायण कोरगप्पा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि निजद नेते, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा कार्यकाळ 25 जून रोजी संपणार असल्याने राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. चार जागांसाठी सोमवारी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज पडताळणीवेळी अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवार 11 जून अखेरचा दिवस होता. अंतिमत: निवडणूक रिंगणात चारच उमेदवार राहिल्याने त्यांनी राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे पवन खेरा वगळता सर्व उमेदवार कर्नाटकातील आहेत. पवन खेरा हे दिल्लीतील आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.