महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राजवर्धनसिंह कदमबांडे विशेष विमानाने कोल्हापूरच्या सभेसाठी रवाना

05:10 PM Apr 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत भाषण करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले विशेष निमंत्रण

धुळे, जळगाव प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराजांचे पणतु आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे नातू धुळ्याचे माजी आमदार राजवर्धनसिंह कदमबांडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी शनिवारी दुपारी विशेष विमानाने कोल्हापूरला रवाना झाले. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी सायंकाळी जाहीर सभा आहे. या सभेत कदमबांडे यांचे देखील भाषण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कदमबांडे यांना कोल्हापूरच्या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष निमंत्रण दिले. तसेच त्यांच्यासाठी विशेष विमानही तातडीने उपलब्ध करून दिले. धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असणारे कदमबांडे हे तेथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. कदमबांडे यांनी 1984 साली इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. राजर्षी शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या सुकन्या पद्माराजे तथा बेबीराजे यांचे राजवर्धनसिंह कदमबांडे सुपुत्र आहेत. कोल्हापूरच्या राजकन्येचा सुपुत्र म्हणून त्यांची ओळख आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Next Article