For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Raju Shetty : "आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना!" साखर बंदीवर राजू शेट्टींचा केंद्रावर घणाघाती प्रहार

03:58 PM May 14, 2026 IST | NEETA POTDAR
raju shetty    आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना   साखर बंदीवर राजू शेट्टींचा केंद्रावर घणाघाती प्रहार
Advertisement

                                    30 सप्टेंबर पर्यंत देशातून होणाऱ्या साखर निर्यातीवर बंदी

Advertisement

कोल्हापुर - केंद्र सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत देशातून होणाऱ्या साखर निर्यातीवर बंदी घातली आहे.देशात साखर निर्यातीवर पूर्वी मर्यादित बंदी होती..मात्र आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.. केंद्र सरकारचा हा साखर निर्यात संदर्भातील मोठा निर्णय असुन या साखर निर्यात बंदीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे..आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी अवस्था साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया शेट्टी यांनी साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर दिली आहे.

काय म्हणाले नेमकं राजू शेट्टी?

Advertisement

राजु शेट्टी म्हणाले, आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी अवस्था साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया शेट्टी यांनी साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर दिली आहे. गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवलेला नाही. साखरेचा विक्री दर न वाढवल्यामुळे चार वर्षांपासून साखरेचे भाव स्थिर आहेत. ते वाढलेले नाहीत. देशात साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे, ही गोष्ट खरी आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करु नये?. स्वतःही भाव वाढवत नाही आणि कारखान्यांना साखर निर्यातीवर तुम्ही बंदी घालता. यामागचे केंद्र सरकारचा तर्क काय आहे? असे सवाल शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत.

सरकार साखरेचा स्वतः ही भाव वाढवत नाही..आणि परदेशातही विक्री करु देत नाही..गेल्या चार वर्षांपासून सरकारने साखरेची एमएसपी वाढवलेली नाही..त्यामुळे साखरेचे दर स्थिर राहिल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.. शिवाय सरकारचा साखर निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे मूर्खपणा आणि भंपकपणा आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी केला आहे..

का घेतला सरकारने हा निर्णय?

केंद्र सरकारने बुधवारी साखरेच्या निर्यातीवर तत्काळ ३० सप्टेंबरपर्यंत अथवा पुढील आदेशांपर्यंत बंदी लागू केली. देशात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवणे आणि देशांतर्गत साखरेचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा केंद्राचा या निर्णयामागील उद्देश आहे.

Advertisement
Tags :

.