For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजू शेट्टी यांचा पुणे- बेंगलोर महामार्गावर ठिय्या! शेतकरी संघटनेने महामार्ग रोखून धरला

01:22 PM Nov 23, 2023 IST | Kalyani Amanagi
राजू शेट्टी यांचा पुणे  बेंगलोर महामार्गावर ठिय्या  शेतकरी संघटनेने महामार्ग रोखून धरला
Advertisement

ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुंबई येथे चौथी बैठक पार पडली. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे ही बैठक फिस्कटली. यानंतर राजू शेट्टी यांनी ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट करून गुरुवारी चक्काजाम आंदोलन करणारच असे जाहीर केले होते.त्यानुसार राजू शेट्टी हे आ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडला आहे.

Advertisement

राजू शेट्टींच्या आगमनाने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून त्यांनी यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुलाची शिरोली येथील दर्ग्यासमोर कार्यकर्ते रिंगण घालून बसले असून येथे आसूड ओढले जात आहेत. किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे सत्ताधारी आणि विरोधक शेतकरी आंदोलनावर आणि ऊस दरावर गप्प का असा परखड सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी विचारला. गेले महिनाभर हजारो कार्यकर्ते जिल्हाभर आणि फिरत आहेत ऊसदरासाठी त्यांनी खरडा भाकर काढून दिवस काढले आहेत तरी देखील सत्ताधारी यांची कोणतीही दखल घेत नाही. स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणारे विरोधी पक्षनेते या ऊस दरावर चिडीचुपी घेतली आहे. असं शेट्टी म्हणाले.

हे सरकार कारखानदारांना पाठीशी घालत आहे, सरकारने जर आम्हाला अटक करायचे ठरवले असेल तर इतक्या लोकांची सोय करावी, अन्यथा आम्ही पुन्हा इथेच येऊन बसू, सगळे सत्ताधारी आणि विरोधक आणि कारखानदार यांचा कळप आहे. या सगळ्यांची मिली भगत आहेत अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement

.