For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Raju Shetty | बारामती-दौडमधील भेसळयुक्त गुळावर राजू शेट्टींचा निशाणा, म्हणाले...

07:11 PM Apr 11, 2026 IST | NEETA POTDAR
raju shetty   बारामती दौडमधील भेसळयुक्त गुळावर राजू शेट्टींचा निशाणा  म्हणाले
Advertisement

                                            कोल्हापुरात भेसळयुक्त गुळावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

Advertisement

कोल्हापूर -  गेल्या बऱ्याच दिवसापासुन कोल्हापुरात भेसळ युक्त गुळाची चर्चा सुरु आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये आढळलेल्या भेसळयुक्त गुळामुळे बाजारपेठेत परिणाम दिसून येतोय.. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या भेसळयुक्त गुळाला ग्राहकांची मागणी कारणीभूत असल्याचे म्हटलं आहे.. ग्राहकांनाच चमकणारा पांढरा शुभ्र गूळ हवा असल्यामुळे काही गुळामध्ये ही साखरेचं प्रमाण वाढवलं जात.. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकमधील गूळ विक्री केला जातो, बारामती दौड याठिकाणी भेसळयुक्त गूळ बनवला जातो. त्यामुळं गुळाची मार्केट बदनाम होऊ लागली आहे..

कोल्हापुरी गुळाला वैशिष्ट्य आहे, त्याच देशभर मार्केट आहे कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकमधील गूळ विक्री केला जातो, बारामती दौड याठिकाणी भेसळयुक्त गूळ बनवला जातो या सगळ्यामुळं ग्राहकांची फसवणूक होऊ लागली आहे याला जबाबदार काही अंशी ग्राहक आणि व्यापारीच आहे ग्राहकांनाच चमकणारा पांढरा शुभ्र गूळ हवा असल्यामुळे काही गुळामध्ये ही साखरेचं प्रमाण वाढवलं जात... असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.