राजू शेट्टींच्या लढ्याला यश; ऊसदाराचा तिढा सुटला! तोडग्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
गेल्या महिनाभर सुरु असलेल्या ऊसदराचा तिढा आज सुटला असून आज दिवसभर पुणे बेंगलोर महामार्ग आडवून बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागिल 400 रूपये अधिक यावर्षीचा 3500 रूपयावर तोडगा काढण्यात आला आहे. मागील वर्षामध्ये तुटलेल्या ऊसाला 100 रूपये तसेच यावर्षीच्या हंगामासाठी एफआऱपी आधिक 100 रू असा तोडगा निघाला आहे. श्रीमंत शाहू छत्रपती आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघाला.
आज पुलाची शिरोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केलं. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी स्वाभिमानीने पुणे- बेंगलोर महामार्ग आज दिवसभर रोखून धरला. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करून शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान शाहू महाराज छत्रपती यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला दर्शिवला. आणि शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहीजेत असे आवाहन केले. त्यानंतर शाहू छत्रपतींनी प्रशासनाला बोलावून बैठक घेण्याचे आवाहन केले.
सायंकाळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीमध्ये आणि शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकार्यांच्यात झालेल्या बैठकीत मागील वर्षी तुटलेल्या उसाला १०० रूपये तसेच यंदाची पहिली उचल प्रतिटनला एफआरपी अधिक १०० रूपये असा दर देण्याचे ठरले आहे. ऊसदराच्या या तीढ्यावर तोडगा निघाल्यानंतर पुणे- बेंगलोर महामार्गावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.