For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सांगलीत कृष्णा नदी कोरडी; पाणी सोडण्यासाठी राजू शेट्टी आक्रमक

12:02 PM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांगलीत कृष्णा नदी कोरडी  पाणी सोडण्यासाठी राजू शेट्टी आक्रमक
Advertisement
सांगली : कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही कृष्णा नदीत पाणी सोडले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, नदीकाठच्या गावांतील पाणीटंचाई दूर करावी आणि पाणी उपसण्यावरील बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असूनही शेतीसाठी पाणी उपसण्यावर निर्बंध का घातले जात आहेत, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. ऊसासह अन्य पिकांना पाण्याची गरज असताना उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी राखीव असलेले ६७.५० टीएमसी पाणी शेती आणि पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, पाणी उपसण्यावरील बंदी उठवावी आणि पाणीवाटपाचे योग्य नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्यावी, अशा मागण्या राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.

शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली आहे. आता या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते आणि कृष्णा नदीत पाणी सोडण्याबाबत कोणता निर्णय होतो, याकडे शेतकरी आणि नदीकाठच्या गावांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.