For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मागचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही ; राजू शेट्टींचा इशारा

04:48 PM Sep 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
मागचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही   राजू शेट्टींचा इशारा
Advertisement

Raju Shetti News : उसाची एफआरपी आणि प्रतिटन 400 रुपये देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू असा वारंवार इशारा देऊनही सरकारला गांभार्य नाही.मात्र आता 400 रूपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.मागचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय कारखाना सुरु होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. राज्य सरकार बेजबाबदार काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपी अधिक टनाला 400 रुपये इतकी रक्कम मिळाली पाहिजे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.

Advertisement

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, गतवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली असता एफआरपी ताबडतोब 15 दिवसांत हंगाम संपल्यानंतर, प्रतिटन 200 रुपये आणि वर्षभरात साखरेचे दर पाहून उर्वरित रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. गेल्या वर्षभरात ज्या मागण्यांचा पाठपुरावा केला त्यातील निम्मे आदेश निघाले आहेत.त्याची अंमलबजावणी राहिली आहे. मागील दोन वर्षाचा हिशोब घ्या, यासाठी एक वर्ष सरकारच्या मागे लागलो. मात्र सरकारने हिशोब घेतला नाही. आता सरकारचा हिशोब गेला चुलीत.आता आमचा हिशोब मागायचा.मुकाट्याने गेल्या वर्षीच्या उस टनाला 400 रूपये द्यायचे. मागचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

काय आहेत मागण्या
साखर कारखानदारांनी टनाला 400 रूपये दुसरा हप्ता तात्काळ द्यावा
कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करावेत
ऊस वाहतूकीच्या समस्या सोडवाव्यात यासह अन्य मागण्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.