कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Raju Shetti यांचं ठरलं! अगामी निवडणुका स्वबळावरच लढण्याचा निर्धार

05:04 PM Jun 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

'राज्य सरकार शेती प्रश्नावर व महागाई कमी करण्याबाबत अपयशी ठरते'

Advertisement

शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे. राज्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व मंत्र्यांचे दौरे असताना सातत्याने नजरकैदेत ठेवले जात आहे. राज्य सरकार शेती प्रश्नावर व महागाई कमी करण्याबाबत अपयशी ठरते आहे.

Advertisement

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा निवडणुका स्वाभिमानीमार्फत ताकदीने स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.

शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, महापूर, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची लूट, स्मार्ट मीटर विरोधी जनआंदोलन, पिकविमा घोटाळा, कर्जमाफी आणि ऊस दराच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी टारे क्लब येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राजू शेट्टी शिरोळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी बोलताना व्यासपीठावर मान्यवर. म्हणाले, राज्य सरकारकडून चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीधर्माच्या नावाखाली फूट पाडून सामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केले जात आहे.

यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आपल्या प्रश्नांची, अडचणींची जाणीव करून दिली पाहिजे, असे आवाहन केले. तसेच राज्याचे कृषीमंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत. तर मुख्यमंत्री सौरऊर्जेचे सोलर पॅनेल खपविण्यासाठी अदानीचे मार्केटींग मॅनेजर झाल्याची टीका त्यांनी केली.

आज झालेल्या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल चौगुले, स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी तानाजी वठारे, स्वाभिमानी युवा आघाडीच्या तालुकाध्यक्षपदासह विविध पदांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी आण्णाप्पा पाणदारे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यात स्वाभिमानी पक्षाचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हाध्यक्ष अजित पोवार, शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisement
Tags :
@kolhapur#raju shetti#sthanik swarajy sanstha elections#swabhimani sanghatna#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article