For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिथं चांगला दर, तिथेच ऊस देणार ; राजू शेट्टींचा इशारा

02:25 PM Sep 16, 2023 IST | Abhijeet Khandekar
जिथं चांगला दर  तिथेच ऊस देणार   राजू शेट्टींचा इशारा
Advertisement

Raju Shetti News : राज्याबाहेर ऊस नेण्यास यंदा राज्य सरकारने बंदी घातली आहे.अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.यंदाच्या हंगामात राज्यात उसाचे पीक खूप कमी झाले आहे.त्यामुळे गळीत हंगाम जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. म्हणूनच सरकारने राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे.

Advertisement

राज्यातील साखर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहावा यासाठी सहकार कायद्यातील ऊस नियंत्रण तरतुदीनुसार ही बंदी घातली आहे.यंदा राज्यात पावसाचे प्रमाण खूप कमी झालं आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन देखील कमी झालं.त्यातच कर्नाटकातील गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.त्यामुळे उसाची पळवा पळवी होऊ शकते.मात्र, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.चांगला दर मिळेल तिथेच आम्ही ऊस देणार,आम्हाला अडवून दाखवा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर कारखानदारांकडू सरकारने हिशोब घ्यावा, यासाठी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहोत. मात्र सरकारला वेळ नाही.हिशोब न घेतल्यामुळे तीन वर्षाची बिलं आम्हाला मिळाली नाहीत.एका बाजूला कारखानदारांचे लाड केले जातात.त्यांचे हिशोब घेतले जात नाहीत. दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैशे वापरायला त्यांना मुभा देता.यंदा कारखान्यांना ऊस कमी पडतोय, म्हणून राज्याबाहेर ऊस नेण्यास निर्यात बंदी घालता. मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातले ट्रिपल इंजिन सरकार काम करतयं. मात्र 'वन नेशन, वन मार्केट'हे मोदी सरकारचे धोरण आहे.त्याला कोणताही शेतीमाल अपवाद नाही. असे असताना त्यांच्याच निर्णयाला हे सरकार छेद देत आहे.मात्र तुम्ही कितीही बंदी घाला ज्याठिकाणी उसाला चांगला भाव मिळेल त्याच ठिकाणी ऊस पाठवणार असा इशारा राजू शेट्टी यांना दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.