राजू पवार डान्स अकॅडमीचा उद्या वर्धापन दिन
बेळगाव : राजू पवार डान्स अकॅडमीच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. 9 रोजी ‘एक श्याम देश के नाम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6 वाजता मिलेनियम गार्डन, टिळकवाडी येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गाण्यांवर डान्स तसेच मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे उपस्थित राहणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून बेळगावसह परिसरामध्ये नृत्याचे धडे देणाऱ्या राजू पवार यांच्या डान्स अकॅडमीला 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर मंगेश पवार, डेप्युटी कमांडंट कर्नल व्ही. के. बी. पाटील, महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.