महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायव्य परिवहनच्या अध्यक्षपदी राजू कागे

06:22 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

34 निगम-महामंडळांची यादी जाहीर : इच्छेविरुद्ध जबाबदारीमुळे काही आमदार नाराज

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर निगम-महामंडळांवर अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. केवळ 34 निगम-महामंडळांची यादी जाहीर करून आमदारांची वर्णी लावण्यात आली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या नेमणुकीवरून गोंधळ निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांची यादी रोखून धरण्यात आली आहे. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील दोघांना निगम-महामंडळांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांना वायव्य परिवहन निगमचे तर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांना कर्नाटक राज्य वित्त संस्थेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. ही यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे.

निगम-मंडळांच्या अध्यक्षपदाची आशा बाळगलेल्या काही आमदार, विधानपरिषद सदस्यांनी यादीत नाव नसल्याने संताप व्यक्त केला आहे. तर ‘वजनदार’ नसलेल्यांना निगमचे अध्यक्षपद मिळाल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या अध्यक्षपदाची यादी जाहीर करण्यास विलंब झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. नाराजी उफाळून येऊ नये यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

निगम-महामंडळ अध्यक्षांची यादी जाहीर होताच कारवारचे आमदार सतीश सैल, बागेपल्लीचे सुब्बा रे•ाr, गुब्बीचे आमदार एस. आर. श्रीनिवास, सिंधनूरचे हंपनगौडा बादर्ली, रायचूरचे बसवनगौडा दद्दल, हुनगुंदचे विजयानंद काशप्पनवर यांच्यासह सात-आठ आमदार आपल्याला मिळालेल्या निगम-महामंडळावर समाधानी नाहीत. आपल्याला पात्रतेनुसार जबाबदारी मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली आहे.

निगम-महामंडळांच्या अध्यक्षपदापासून वंचित राहिलेल्या आमदारांची आणि इच्छेनुसार निगम-मंडळाचे अध्यक्षपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा आमदारांना भविष्यात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासनही दिले जात आहे.

सर्वांशी चर्चेनंतरच नेमणुका : शिवकुमार

सर्वांची मते जमा करून चर्चेनंतरच निगम-महामंडळांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. निगम-महामंडळांची यादी तयार करताना मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. काही जणांनी विशिष्ट पद देण्याची मागणी केली आहे. ही यादी उघड करणे शक्य नाही. सर्वांना मंत्री, मोठ्या मंडळांच्या अध्यक्षपदाची आशा असते. दोन वर्षानंतर पुन्हा बदल केले जातील. अधिकार अवधी संपल्यानंतर इतरांनाही संधी द्यावी, अशी सूचना दिली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

 

निगम-महामंडळांवरील अध्यक्षपदे...

आमदारांची नावे (मतदारसंघ)        निगम-महामंडळ

राजू कागे (कागवाड)           वायव्य परिवहन निगम नि.

महांतेश कौजलगी (बैलहोंगल)         कर्नाटक राज्य वित्त संस्था

सतीश सैल (कारवार)         कर्नाटक मार्केटींग कन्सल्टंट अॅण्ड एजन्सीस

विनय कुलकर्णी (धारवाड)                कर्नाटक शहर पाणीपुरवठा-सांडपाणी व्यवस्थापन मंडळ

प्रसाद अब्बय्या (हुबळी-धारवाड पूर्व)             कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ

अप्पाजी नाडगौडा (मुद्देबिहाळ)    कर्नाटक सोप अॅण्ड डिटर्जंट लि. नि.(केएसडीएल)

एच. वाय. मेटी (बागलकोट)            बागलकोट नगरविकास प्राधिकरण

एस. आर. श्रीनिवास (गुब्बी)            कर्नाटक राज्य रस्ते परिवहन निगम (केएसआरटीसी)

सी. पुट्टरंगशेट्टी (चामराजनगर) एमएसआयएल (म्हैसूर सेल्स इंटरनॅशनल लि.)

बी. के. संगमेश (भद्रावती)                कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा निगम

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article