For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्स क्रिकेट क्लबकडे राजू दोड्डण्णावर चषक

10:18 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॅक्स क्रिकेट क्लबकडे राजू दोड्डण्णावर चषक
Advertisement

श्लोक चडिचाल मालिकावीर, समर्थ चंदिगिरी सामनावीर

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णवर चषक चषक तेरा वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात मॅक्स क्रिकेट क्लबने बेळगाव वॉरियर्स संघाचा पाचगड्याने पराभव करून राजू दोड्डण्णावर चषक फटकाविला. मालिकावीर श्लोक चडिचाल, समर्थ चंदिगिरी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भगवान महावीर मैदानावरती घेण्यात आलेला अंतिम सामन्यात बेळगाव वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 9 गडी बाद 92 धावा केल्या. ओजस गडकरीने चार चौकारासह 27, अल्तमश सनदीने दोन चौकारासह 14, तर श्लोक चडिचालने दहा धाव केल्या.

मॅक्सतर्फे समर्थ चंदीगिरीने 17 धावांत 4, समर्थ तलवारने 7 धावांत दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅक्स क्रिकेट क्लबने 21.5 षटकांत पाच गडी बाद 93 धावा करून सामना जिंकला. त्यात समर्थ चंदिगिरी तीन चौकारासह 28, तर अवनी शिकलासपुरणे दोन चौकारासह 12 धावा केल्या. बेळगाव वॉरियसतर्फे आऊष जंगीने 18 धावात दोन, अल्ताफ असणे एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुरेश गडकरी, मासूद महाऊख विशाल चडिचाल व आनंद करडी यांच्या हस्ते विजेत्या मॅक्स क्रिकेट क्लबला व बेळगाव वॉरियर संघाला चषक प्रमाणपत्र व पदके देऊन गौरवण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर समर्थ चंदिगिरी, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज सचिन तलवा। मालिकावीर श्लोक चडिचाल याला चषक देऊन गौरवण्यात आले. मॅक्स संघात वेदांत मादण्णावर, श्रवण पाटील, समर्थ तलवार, स्वतीक मादार, समर्थ चंदिगिरी, प्रितम हंचीनमनी, प्रितम रेड्डी निडोणी, शिवतेज सुतार, अजय कात्राळे, अवणी, हुसेन मारूफ, फकरूद्दीन पिरजादे, नुमान गादीवाले, उमर मुजावर आदी खेळाडूंची समावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.