For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजमाता सिंधियांवर दिल्ली एम्समध्ये उपचार

06:11 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजमाता सिंधियांवर दिल्ली एम्समध्ये उपचार
Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, गुना

Advertisement

शिवपुरीतील भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवीराजे सिंधिया यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. माधवीराजे सिंधिया यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांचे पुत्र केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे गुना-शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. आईची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे दिल्लीला रवाना झाल्या होत्या. त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया हेसुद्धा निवडणूक प्रचारदौरा आवरता घेत दिल्लीला रवाना झाले आहेत

Advertisement
Advertisement
Tags :

.