राजकुमार राव करणार चित्रपट निर्मिती
आदित्य निंबाळकरसोबत हातमिळवणी
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने चालू वर्षात अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिस्टर अँड मिसेस माही, स्त्राr 2 हे त्याचे चित्रपट यशस्वी ठरले आहेत. तर यापूर्वी तो विक्की विद्या का वो वाला वीडियो या चित्रपटात दिसून आला आहे. राजकुमारने आता नव्या चित्रपटासाठी दिग्दर्शक आदित्य निंबाळकरसोबत हातमिळवणी केली आहे. आदित्यने यापूर्वी सेक्टर 36 या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
राजकुमारचा नवा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. राजकुमार या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी पेलणार आहे. हा चित्रपट एका हत्येवर आधारित डार्क कॉमेडी धाटणीचा असेल. अभिनेत्याने निर्मात्याची जबाबदारी स्वीकारत नेटफ्लिक्सोबत डायरेक्ट-टू-डिजिटल करार केला आहे.
पुढील महिन्यात याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव हा अभिनयासोबत सहनिर्मात्याची जबाबदारी उचलणार आहे. आदित्य निंबाळकर दिग्दर्शित या चित्रपटासोबत राजकुमार हा आणखी एका चित्रपटात दिसून येणार आहे. पुलकित यांच्याकडून दिग्दर्शित ‘मालिक’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे.