‘बकासुरा रेस्टॉरंट’च्या हिंदी रिमेकमध्ये राजकुमार
अभिनेता राजकुमार राव हा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. राजकुमार हा पुढील काळात तेलगू चित्रपट ‘बकासुरा रेस्टॉरंट’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसून येणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. हिंदी रिमेकमधील मुख्य भूमिकेसाठी त्याच्या नावावर चर्चा सुरू आहे. राजकुमार रावने हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्राr’ आणि ‘स्त्राr 2’मधील स्वत:च्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. बकासुरा रेस्टॉरंट हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला होता. एसजे शिवा यांच्याकडून दिग्दर्शित आणि लिखित हा तेलगू हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यात प्रवीण, जय कृष्णा, विवेक दंडु, अमर लथु, राम पाटस आणि शाइनिंग फणी यासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. राजकुमार यापूर्वी ‘मालिक’ या चित्रपटात दिसून आला होता. हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता. तर अभिनेता राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा लवकरच आईवडिल होणार आहेत.