For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला

03:08 PM Sep 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला
Advertisement

चबुतऱ्या सभोवतालच्या पदपथ दुरुस्तीसाठी दोन महिने होता बंद

Advertisement

प्रतिनिधी । मालवण

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालच्या पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत २२ जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (सावंतवाडी) ने बंद केला होता. पावसाळ्यात किल्ले सिंधुदुर्ग बंद केल्यानंतर राजकोट किल्ला आणि शिवपुतळा पर्यटकांसाठी आकर्षण होते, मात्र चबुतऱ्याचा काही भाग खचल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी राजकोट किल्लाच बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर गेले दोन महिने चबुतऱ्याच्या सभोवती असलेल्या पदपथाची दुरुस्ती योग्यप्रकारे करण्यात आली असून आता पुन्हा राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सप्टेंबरपासून अधिकृतरित्या पर्यटन हंगाम सुरू झालेला असताना किल्ले सिंधुदुर्ग दर्शन होडी सेवा अद्याप सुरू झालेली नाही, राजकोट किल्ला स्थळी शिवपुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.