राजीव बजाज संचालक मंडळाचा राजीनामा देणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बजाज फायनान्सने आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीत 5,465 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षातील याच तिमाहीतील 4,480 कोटींच्या तुलनेत यात 22 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. चांगल्या निकालांसोबतच, कंपनीने राजीव बजाज संचालक मंडळाचा राजीनामा देत असल्याची माहितीही दिली आहे.
विश्लेषकांनी या तिमाहीसाठी 5,490 कोटींच्या नफ्याचा अंदाज वर्तवला होता, कंपनीचे निकाल जवळपास तेवढेच राहिले आहेत. कंपनीचा महसूलही गेल्या वर्षीच्या 18,294 कोटींवरून 18 टक्क्यांनी वाढून 21,606 कोटींवर पोहोचला आहे. राजीव बजाज 30 जुलैला पायउतार होणार
कंपनीने शेअर बाजारात दाखल केलेल्या माहितीनुसार, राजीव बजाज यांनी संचालक मंडळातून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत पुनर्नियुक्तीसाठी स्वत:ला सादर करणार नाहीत. त्यामुळे, 30 जुलै 2026 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ते बिगर -कार्यकारी संचालक पदावरुन रिक्त होणार आहेत.
भागधारकांना लाभांश
निकालासोबतच, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 6 च्या लाभांशाची घोषणा केली आहे. यामध्ये 0.60 च्या विशेष लाभांशाचाही समावेश आहे, जो बजाज हाउसिंग फायनान्सच्या शेअर्सच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून दिला जात आहे.