For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडसइंड बँकेच्या सीईओपदी राजीव आनंद

09:58 PM Aug 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंडसइंड बँकेच्या सीईओपदी राजीव आनंद
Advertisement

ऑगस्ट 2028 पर्यंत नियुक्ती राहणार

Advertisement

नवी दिल्ली :

अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर, इंडसइंड बँकेला नवीन सीईओ मिळाले आहेत. बँकेने राजीव आनंद यांना तीन वर्षांसाठी एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा राहणार आहे. कार्यकाळ 25 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल, जो 24 ऑगस्ट 2028 पर्यंत राहील. तथापि, वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मान्यता आवश्यक राहणार आहे. राजीव आनंद, राहुल शुक्ला आणि अनुप साहा या तीन वरिष्ठ बँकर्सची नावे बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे पाठवली होती.

Advertisement

हे पद 1 मे पासून रिक्त

एप्रिल महिन्यात, इंडसइंड बँकेतील डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे माजी सीईओ सुमंत कथपालिया आणि डेप्युटी सीईओ अरुण खुराणा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त राहिले होते.

राजीव आनंद कोण आहेत?

सध्या, राजीव आनंद अॅक्सिस बँकेत डेप्युटी एमडी म्हणून काम करत होते. इंडसइंड बँकेचे सीईओ म्हणून त्यांना पहिली पसंती होती. ते अॅक्सेस अॅसेट मॅनेजमेंटचे संस्थापक एमडी आणि सीईओ देखील राहिले आहेत. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी देखील घेतली आहे. गेल्या 35 वर्षांपासून, राजीव आनंद बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात सेवा देत आहेत.

Advertisement
Tags :

.