For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रजनीकांतांचे वक्तव्य, तामिळनाडूत राजकीय खळबळ

06:39 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
रजनीकांतांचे वक्तव्य  तामिळनाडूत राजकीय खळबळ
Advertisement

द्रमुक नेत्यांनी केले  लक्ष्य 

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

अभिनेता रजनीकांत यांच्या वक्तव्यावरून तामिळनाडूत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुक नेते दुरई मुरुगन यांनी रजनीकांत यांच्या जुने विद्यार्थी असा संदर्भ असलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. चित्रपटांमध्ये देखील काही असे जुने अभिनेते आहेत, जे नव्या अभिनेत्यांना पुढे येण्यापासून रोखत आहेत असे मुरुगन यांनी म्हटले आहे.

Advertisement

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात रजनीकांत यांनी एका शाळेत शिक्षकाला (एम.के. स्टॅलिन) नवे विद्यार्थी सांभाळण्यास कुठलीच अडचण येत नाही, परंतु जुने विद्यार्थी सांभाळताना त्रास होतो, कारण जुने विद्यार्थी सामान्य नाहीत, ते रँकधारक विद्यार्थी असून वर्ग (द्रमुक) सोडणार नाहीत, असे म्हटले होते.

दुरई मुरुगन यांना काहीही विचारले तर ते चांगलेच म्हणतील, परंतु ते आनंदाने  बोलत आहेत का निराशेपोटी हेच समजत नाही. इतके सर्वकाही सांभाळण्यासाठी स्टॅलिन यांचे कौतुक करावे लागेल असे रजनीकांत यांनी म्हटले होते.

रजनीकांत यांच्या या टिप्पणीवर द्रमुक नेते मुरुगन यांनी हा प्रकार चित्रपटसृष्टीप्रमाणेच असल्याचे म्हटले. चित्रपटांमध्ये काही जुन्या अभिनेत्यांमुळे नव्या युवा कलाकारांना वाव मिळत नाही. जुने कलाकार दाढी वाढवत, सर्व दात पडल्यावरही अभिनय करत असल्याची टीका मुरुगन यांनी केली.

मुरुगन जुने मित्र : रजनीकांत

मुरुगन हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी जे काही म्हटले, तो काही मुद्दा नाही. आमची मैत्री कायम राहणार आहे. मी अभिनेता विजयला स्वत:च्या पक्षाच्या स्थापनेसाठी शुभेच्छा देतो असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.