सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' आता जपानमध्ये होणार रिलीज
चेन्नई
सुपरस्टार 'रजनीकांत' यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'जेलर' हा जपानमध्ये लवकरच प्रदर्शित होणार आहे. '२१ फेब्रुवारी' ला नेल्सन दिग्दर्शित 'जेलर' हा सिनेमा जपान मध्ये प्रदर्शित होत आहे. जपानमधील चाहत्यांकडून सोशल मीडियावर असे दावे केले जात आहेत की हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहे कारण अनेक ठिकाणी अधिक स्क्रीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जेलर हा सिनेमा जपनीज भाषेत डब्ड करण्यात आला आहे.
'जेलर' जेव्हा वर्ल्डवाईड रिलीज झाला होता. तेव्हा ब्लॉकबस्टर सुपरहीट सिनेमा ठरला होता. या सिनेमाने ६५० कोटींचा बिझनेस वर्ल्ड वाईल्ड केला होता. या सिनेमाने जगभरातून पहिल्याच दिवशी ३३ कोटींची ओपनिंग केली होती. सुपरस्टार रजनीकांत यांच्या करिअरमधील जेलर हा सर्वात जास्त ओपनिंग देणारा सिनेमा ठरला.
'जेलर'ला जगभरातून मिळालेल्या प्रतिसादानंतर सिनेमाचे निर्माते 'सन पिक्चर्स' यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना 'BMW X7' ही लक्झरीयस चारचाकी गाडी भेट म्हणून दिली. निर्मात्यांचा आनंद इथेच थांबला नाही, तर त्यांनी जेलरचे दिग्दर्शक 'नेल्सन दिलीपकुमार' आणि संगीत दिग्दर्शक 'अनिरुद्ध रविचंदर' या दोघांना पोर्शे ही लक्झरीयस चारचाकी आणि चेक अशी भेट दिली.
यासोबतच 'जेलर'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा घोषित केला आहे. 'जेलर २' चे संगीत 'अनिरुद्ध रविचंदर' आणि दिग्दर्शन 'नेल्सन दिलीपकुमार' हे दोघे करणार आहेत. नुकताच 'जेलर २' चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांनी या टीझरलाही उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. या टीझरमध्ये 'दिग्दर्शक नेल्सन' आणि संगीत दिग्दर्शक 'अनिरुद्ध' हे दोघेही कथेवर चर्चा करताना दिसतात.