कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांनी काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढवलं !
कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे काही तास बाकी असतानासुद्धा काँग्रेसचे टेन्शन काही कमी झालेलं नाही. कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी दाखल केलेल्या राजेश लाटकर यांनी काँग्रेसचे टेन्शन वाढवलं आहे. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु अवघ्या काही तासांमध्ये उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान, राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावेळी बोलताना राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, असा थेट आरोप कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर केला होता.
लाटकर यांची उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा त्यानंतर रंगली होती. मात्र नाॅटरीचेबल झाल्याने एक प्रकारे काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.