For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics | मी, महाडीक, सतेज पाटील एकमेकांचे मित्र होतो, पण... MLA क्षीरसागरांनी कोणता किस्सा सांगितला?

05:39 PM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur politics   मी  महाडीक  सतेज पाटील एकमेकांचे मित्र होतो  पण    mla क्षीरसागरांनी कोणता किस्सा सांगितला
Advertisement

कोल्हापुर- मी २४ तासांपैकी १८ तास सातत्याने काम करणारा कार्यकर्ता असून माझ्या कार्यालयात कधीही कोणतेही व्यापारी किंवा मोठे कॉन्ट्रॅक्टर भेटणार नाहीत, तर तिथे येणारी लोकं ही फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनताच असते, असा स्पष्ट टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत निशाणा साधला, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सतेज पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा आणि जुन्या संबंधांचा पाढा वाचला..

Advertisement

काय म्हणाले राजेश क्षीरसागर

खासदार महाडीकांनी आ. सतेज पाटील यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला या असं वक्तव्य केलं होतं यासंदर्भात त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यावर आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, आम्ही दोघे,महाडिक कॉलेजच्या काळापासूनचे एकमेकांचे मित्र आहोत. महाडिक परिवाराशी त्यांचे काय संबंध होते हे बाजूला ठेवले, तरी सतेज पाटील यांना एकेकाळी महादेवराव महाडिक यांचा देखील मोठा पाठिंबा मिळाला होता.

Advertisement

महाडिक यांनी सतेज पाटील यांना आणि पाटील यांनी महाडिकांना एकमेकांना वेळोवेळी राजकीय मदत केली आहे, इतकेच नाही तर सतेज पाटील यांच्या राजकीय यशाचा पाया हा शिवसेनेमुळेच रचला गेल्याचा दावा करत क्षीरसागर पुढे म्हणाले की, सतेज पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले ते केवळ शिवसेनेमुळेच झाले आहेत शिवसेनेचे बोट धरूनच ते पहिल्यांदा विधिमंडळात पोहोचले, मात्र आमदार झाल्यावर त्यांनी पूर्ण शिवसेनाच सोबत घेऊन जाण्याचे काम केले. असे असतानाही, २०१९ च्या निवडणुकीत माझ्या विरोधात अत्यंत पद्धतशीरपणे जातीयवादी विष पेरण्याचे काम करण्यात आले, असा घणाघाती आरोप करत क्षीरसागर यांनी केला,

त्यावेळी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला.. असं म्हणत आम्ही कधीचं कुणाच्या मागे खंजीर खुपसण्याचे काम नाही केलं असं म्हणत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे... आता यावर आ. सतेज पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे..

Advertisement
Tags :

.