कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश क्षीरसागर विजयी
शिवसेना शिंदे गटाचे उमेद्वार राजेश क्षीरसागर यांचा कॉंग्रेसच्या राजेश लाटकर यांच्यावर विजय
बंटीची वाजवली घंटीः क्षीरसागर
कोल्हापूर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेद्वार राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून विजयी झालेले आहेत. क्षीरसागर हे २००९ आणि २०१४ साठी महाराष्ट्र विधानसभेवर दोन वेळा निवडून आले होते. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेच्या चंद्रकांत जाधव यांनी क्षीरसागरांचा पराभव केला होता.
पण यंदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसचे राजेश लाटकर यांच्यासोबतची लढत चुरशीची ठरली. तरी राजेश क्षीरसागर मतांनी विजयी झाले.
तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने ३० हजार मतांनी वंटीची घंटी वाजवली, अशी प्रतिक्रिया आमदार क्षीरसागर यांनी जल्लोष साजरा करताना दिली. यावेळी ते म्हणाले कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांच्या सहकार्याने विजय झालेला आहे. याचे सर्व श्रेय मी विकासाला देतो. मी विकासावर चर्चा केली पण विरोधकांनी अत्यंत हिन दर्जाची टिका केली. मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. म्हणून हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आणि लाडक्या बहिणींचा म्हणता येईल. हा विजय शिंदे साहेबांच्या गेल्या अडीच वर्षाच्या कामांचा विजय आहे, त्यामुळे त्याच्यावर हक्क त्यांच्याच आहे. लाडक्या बहिणी तीन कोटी आहेत. या बहिणींनी कॉंग्रेसच्या झुठपणाला झुगारून आम्हाला निवडून दिलेलं आहे.
ते पुढे म्हणाले, मी निवडणुकीच्या आधी सांगितलेले जिल्हात दहाच्या दहा जागा महायुतीच्या येणार, पण जिल्हा काय महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त झाला आहे.