दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : प्रतिनिधी
‘दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘ दक्षिण‘ मधील जनता महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील.‘ असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कळंबा परिसरात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मिळाव्याला महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी विकासासाठी साद दिल्यामुळे येथील टोकाच्या राजकीय भूमिकेकडे दुर्लक्ष करून मतदार संघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या सीमांचा विचार न करता, कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील मागणीनुसार विकास कामांना निधी दिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघास कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामुळेच येथील जनता महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी ठाम आहे. त्यांना येथून मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास श्री. क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख उदय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, अॅड. वीरेंद्र मंडलिक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, माजी नगरसेवक अमोल माने, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख अमरजा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवा सेनेचे पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख प्रभू गायकवाड, तालुका प्रमुख शंभू मोरे, प्रकाश सूर्यवंशी, मारुती खडके, युवती सेना शहर प्रमुख तेजस्विनी घाटगे, नम्रता भोसले, निवेदिता तोरस्कर, सचिन पाटील, सचिन संकपाळ, अनिल पाटील, जयवंत चौगले, संतोष लोहार, स्वप्निल ढवण, अनिकेत मोरबाळे, शशिकांत मगदूम, आनंदा पाटील, विठ्ठल मगदूम, अनिल चव्हाण, दत्तात्रय शिंदे, गोरखनाथ वाडकर, सर्जेराव पाटील, सतीश आडसुळे, हर्षद चौगुले, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.