For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:चा विकास.. काँग्रेस नेस्तनाबूत.., Rajesh Kshirsagar यांचा नेमका रोख कुणावर?

03:31 PM May 18, 2025 IST | Snehal Patil
स्वत चा विकास   काँग्रेस नेस्तनाबूत    rajesh kshirsagar यांचा नेमका रोख कुणावर
Advertisement

भगवा फडकवण्यासाठी लवकरच 5 हजार कार्यकत्याचा मेळावा

Advertisement

कोल्हापूर : नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही सोपी नव्हती. सातत्याने विरोचकांकडून आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात होते. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच जयश्री जाधव आपल्याकडे आल्या आणि त्यांनी एक चांगला संकेत दिला.

निवडणूक कोणतीही असो माझ्यासोबत राहणाऱ्या या कट्टर शिवसैनिकांनी मला मदत करून आज जिल्ह्यातील काँग्रेस नेस्तनाबूत केली, असे मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर शहर पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

Advertisement

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्याने शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचा दैवज्ञ बोर्डिंग येथे सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना क्षीरसागर म्हणाले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत आपल्याला भगवा फडकवायचा आहे.

आपण सर्वांनी एक दिलाने कामाला लागा. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्याचा निर्धार करा. मागील निवडणुकीत कसबा बावड्यात मत कमी मिळाली पण यावेळेस चांगली साथ दिली. गेल्या काळात काही जणांनी स्वत:चा विकास केला.

स्वतःची हॉस्पिटल उभारली पण कोल्हापूरचा विकास केला नाही. मी आपल्याला शब्द देतो. की येत्या काळात कोल्हापूरचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून शिवसेनेला महानगरपालिकेत एकदा सत्ता द्या, असे अवाहन त्यांनी केले. यावेळेस माजी आमदार शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव यांनी शहरातील विविध रखडलेल्या प्रश्नाबरोबरच शाहु मिल, उधाने, क्रीडांगणाचा विकास व्हावा असे मत व्यक्त केले.

यावेळेस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संघटक सुनील जाधव, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, शहखमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, दीपक चव्हाण, रमेश खाडे, रणजित मंडलिक, शहर समन्वयक सुनील जाधव, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, युवासेना शहरप्रमुख मंदार पाटील, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर आदी होते.

निर्धार मेळावा..

येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी लवकरच पाच हजार कार्यकत्याचा निर्धार मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.

तिरंगा रॅली..

येत्या २५ तारखेला भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी सकाळी १० वाजता दसरा चौक येथून शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले.

  • शाहू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न
  • महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्याचा निर्धार करा
  • शहराची हद्दवाढ ही लवकरच होणार
Advertisement
Tags :

.