महायुतीतर्फे शक्तिप्रदर्शनासह राजेश बेंडल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज : भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांची गैरहजेरी
गुहागर/ प्रतिनिधी
गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महायुती मधून शिवसेनेला जागा सुटल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत उमेदवारी अर्ज भरण्याचा घेतलेला निर्णय मध्ये राजेश बेंडल यांनी शक्ती प्रदर्शनासह गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते गुहागर शहरात रॅली काढण्यात आली शहरातील गुहागर आगारांसमोरील मोकळ्या जागेमध्ये उपस्थित संबोधित करण्यात आले अवघ्या 24 तासाच्या आत केलेल्या नियोजनामध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी काढलेल्या 24 ऑक्टोबरच्या रॅलीला तोडीस तोड असे शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आले
रॅलीमध्ये उमेदवार राजेश बेंडल यांच्याबरोबर पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, निलेश मोरे, अमरदीप परचुरे, संतोष आग्रे, यशवंत बाईत, बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम, पांडुरंग पाते, रामचंद्र हुमणे, कृष्णा वने, तुकाराम निवाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आधी उपस्थित होते. या रॅलीमध्ये भाजपाची अनुपस्थिती असली तरी भाजपाचे पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद खरे, यशवंत बाईत, आत्माराम मोरे, माजी नगरसेवक गजानन वेल्हाळ, मनीष खरे यांची उपस्थिती होती