For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur BJP | राजेंद्र राऊत यांचा भाजपकडून अर्ज

11:13 AM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur bjp   राजेंद्र राऊत यांचा भाजपकडून अर्ज
Advertisement
भाजप, काँग्रेस तसेच अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी भाजपचे राजेंद्र राऊत यांनी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून आदित्य फत्तेपूरकर यांच्यासह १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यामुळे एकूण अर्जांची संख्या १३ वर पोहोचली आहे. भाजप, काँग्रेस तसेच अपक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार तथा बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महायुतीतील आमदार, पदाधिकारी व शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
शहरातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. दूसरीकडे महाविकास आघाडीच्यावतीने आदित्य फत्तेपूरकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस व आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीतील राजकीय रंगत वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ अन्य पक्ष आणि आघाड्यांच्या तुलनेने मजबूत असल्याने पक्षाचा उमेदवार आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. मात्र, अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Advertisement

यांचे अर्ज दाखल
राजेंद्र राऊत, अशोक वाघमोडे, जीवन जानकर, वसंतराव दौलतराव देशमुख, महेश साठे, रमेश बारस्कर, नागेश अक्कलकोटे, आदित्य फत्तेपूरकर, धनंजय डिकोळे यांच्यासह अन्य उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपकडून दमदार शक्तिप्रदर्शन
राजेंद्र राऊत यांच्या अर्जावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीतील अनेक आमदार, माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे अर्ज दाखल कार्यक्रमाचे रूपांतर शक्तिप्रदर्शनात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपने निवडणुकीपूर्वीच आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

Advertisement
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.