राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलतील
पालकमंत्री हसन मुश्रीफ : आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाडमध्ये सभा
कोल्हापूर :
महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबद्दल मी वचन देतो की या निवडणुकीत त्यांना विजयी करून तालुक्याच्या विकासासाठी संधी द्यावी. ते तुमची सेवा करतील आणि शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतील. आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोहोचपावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देतील असा विश्वास पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कुरुंदवाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे होते.
आमदार यड्रावकर म्हणाले, पाच वर्षात 1 हजार 900 कोटी रुपयांचा निधी आणून शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास साधला आहे. विरोधकांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने वैचारिक पातळी सोडून टीका केली जात आहे. मी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आज मत मागण्यासाठी समोर उभा आहे. स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पांना कुंभार, स्वर्गीय सा.रे पाटील, बाळासाहेब माने, शामराव पाटील यांचा विधायक आणि विकासात्मक वारसा पुढे नेला आहे. विजय भोजे यांनी संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही असे सांगितले. दशरथ काळे म्हणाले, कर्नाटक राज्यातील मंत्री महोदय व माजी आमदारांना आणून या ठिकाणी प्रचार केला जात आहे. अशी वेळ विरोधकांच्यावर आली आहे.
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील जास्तीत जास्त सत्तेतील सरकारच्या योजनेतील विज बिल माफी यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले, शहराचा चौफेर विकास राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी साधला आहे. कुरुंदवाड शहराला 31 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
यावेळी स्वागत दादासाहेब पाटील यांनी केले. यावेळी सतीश मलमे, बबनराव यादव, अँड. ममतेश आवळे, श्रीकांत माळी, चंद्रकांत जोंग, रामचंद्र मोहिते, शहानवाज पिरजादे, सुनील कुरुंदवाडे, प्रा.चंद्रकांत मोरे, भोला कागले, मनीषा डांगे, दादासो पाटील, बबन यादव, अँड. मंतेश आवळे, श्रीकांत माळी, चंद्रकांत जोंग, शहानवाज पिरजादे ‘ सुनील कुरुंदवाडे, चंद्रकांत मोरे, बोला कागले, मल्लाप्पा चौगुले, विद्याधर कुलकर्णी, सतीश मलमे, अमर कुंभार, मनीषा डांगे मनोगत व्यक्त केले.