महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अतिरिक्त एनएसएपदी राजेंद्र खन्ना

06:29 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रॉच्या माजी प्रमुखांना मोठी जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे उपप्रमुख आणि रॉचे माजी प्रमुख राजेंद्र खन्ना यांना अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याचबरोबर सरकारने दोन नवे उपसल्लागार देखील नियुक्त केले आहेत. टी.व्ही. रविचंद्रन तसेच पवन कपूर हे उपसल्लागार असणार आहेत. रविचंद्रन हे आयपीएस अधिकारी असून सध्या इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक पदावर कार्यरत आहेत. तर कपूर हे विदेश मंत्रालयात सचिव (पश्चिम) पदावर आहेत.

2014-16 पर्यंत रॉ प्रमुख राहिलेले राजेंद्र खन्ना यांच्या अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्तीला नरेंद्र मोदींच्या सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत निरंतरता राखण्याचे महत्त्व दर्शविणारा निर्णय मानले जात आहे.  याच निरंतरतेच्या तत्वानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळासोबत तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा नियुक्त करण्यात आले होते.

आता डोवाल यांच्या अधीन एक अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तीन उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यरत असतील. पंकज कुमार सिंह हे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कायम असतील. तर रविचंद्रन हे खन्ना यांच्या जागी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील. कपूर हे एनएसए कार्यालयात विक्रम मिस्त्राr यांची जागा घेणार आहेत.

नवे अतिरिक्त एनएसए राजेंद्र खन्ना हे ओडिशा कॅडरच्या 1978 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी डिसेंबर 2014 पासून डिसेंबर 2016 पर्यंत रॉ प्रमुख म्हणून काम केले होते. त्यापूर्वी ते एजेन्सीमध्ये ऑपरेशन डेस्कचे प्रभारी होते आणि त्यांना पाकिस्तान तसेच दहशतवादविरोधी मोहिमेतील प्राविण्यासाठी ओळखले जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article