For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अमर विश्वास’मध्ये राजीव खंडेलवाल

06:38 AM Feb 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘अमर विश्वास’मध्ये राजीव खंडेलवाल
Advertisement

टीव्हीपासून चित्रपट आणि ओटीटीवर वेगवेगळया भूमिका साकारणारा राजीव खंडेलवाल आता एका नव्या सीरिजमध्ये परतला असून याचे नाव ‘अमर विश्वास’ आहे. ही एक कोर्टरुम ड्रामा सीरिज असून यात राजीवने एका प्रामाणिक वकिलाची भूमिका साकारली आहे. अत्यंत निर्भय आणि सत्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकणाऱ्या आणि गरजूंसाठी लढणाऱ्या वकिलाची ही भूमिका आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून प्रेक्षकांना पसंतही पडत आहे. याच्या ट्रेलरची सुरुवात एका मृतदेहाने होते, हॉटेलच्या खोलीत प्रसिद्ध चित्रपट निर्माता जेस्सू मोमिनचा मृतदेह पडलेला असतो, पोलीस तपास करतात, तेव्हा जेस्सूसोबत खोलीत बहार चक्रवर्ती होती, जे पळाल्याचे समोर येते. तिला अटक करण्यात येते. बहारच्या वतीने अमर विश्वास हा वकील न्यायालयात उभा ठाकतो.या प्रकरणात अनेक ट्विस्ट आणि रहस्यं दडलेली असल्याचे कहाणीत दाखविण्यात आले आहे.  अमर विश्वास ही सीरिज अमेझॉन एमएक्स प्लेयर या ओटीटी

Advertisement

प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे. यात राजीव खंडेलवालसोबत आमिर अली, बरखा बिष्ट आणि रवि बहल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या क्राइम थ्रिलर कोर्ट रुम ड्रामाचे दिग्दर्शन शशांत शाह यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.