For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजावत, प्रणॉय यांची विजयी सलामी

06:34 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजावत  प्रणॉय यांची विजयी सलामी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारी सुरू झालेल्या इंडीया खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या नवोदित प्रियांशू राजवतने आपल्याच देशाच्या तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का देत विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या एका सामन्यात एचएस प्रणॉयने चीन तैपेईच्या चेनचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात प्रियांषु राजवतने 19 व्या मानांकित लक्ष्य सेनचा 16-21, 21-16, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. लक्ष्य सेनचे या स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात नवव्या मानांकित एचएस प्रणॉयने 13 व्या मानांकित चीन तैपेईच्या चोयु चेनचा 21-6, 21-19 असा पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना 42 मिनिटे चालला होता. सदर स्पर्धा येथील के. डी. जाधव इनडोअर हॉलमध्ये घेतली जात आहे. आता एचइस प्रणॉयचा दुसऱ्या फेरीतील सामन राजवत बरोबर होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.