For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानचा 6 धावांनी थरारक विजय

06:58 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानचा 6 धावांनी थरारक विजय
Advertisement

गुजरातचा सलग दुसरा पराभव, सुदर्शनचे प्रयत्न अपुरे : घरच्या मैदानावर गुजरात पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान गुजरात जायंट्सवर 6 धावांनी थरारक विजय मिळवित 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवून विजय घोडदौड कायम राखली आहे. गुजरात जायंट्सचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे. बिस्नॉईला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात गुजरात संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची जरुरी होती आणि त्यांचे तीन गडी खेळावयाचे होते. राजस्थान संघातर्फे तुषार देशपांडेकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी सोपविली. कर्णधार रशिद खान आणि रबाडा या जोडीला या षटकामध्ये केवळ 4 धावा जमविता आल्या तर देशपांडेने या षटकातील पाचव्या चेंडूवर रशिदखानला बाद केले. या षटकापूर्वी गुजरातला राजस्थानच्या तुलनेत विजयाची संधी अधिक होती. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी गुजरातचा विजयाच घास हिसकावून घेतला.

यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव ज्युरेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 210 धावा जमविल्या. ज्युरेलने 42 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 75 तर जयस्वालने 36 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 55 धावा झळकविल्या. वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 31 धावा झोडपल्या. सूर्यवंशी आणि जयस्वाल यांनी सलामीच्या गड्यासाठी 70 धावांची तर जयस्वाल आणि ज्युलेर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागिदारी केली. हेटमायरने 18 धावा जमविल्या. गुजराततर्फे रबाडाने 2 तर मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि रशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात संघातील सलामीचा फलंदाज साई सुदर्शनने 44 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 73, बटलरने 5 चौकारांसह 26, रशिद खानने 3 चौकारांसह 24, रबाडाने 2 षटकार 1 चौकारासह नाबाद 23 धावा झळकविल्या. राजस्थानचा बिस्नॉई सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 41 धावांत 4 गडी बाद केले. बर्गर, तुषार देशपांडे व पराग यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक: राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 6 बाद 210 (ज्युरेल 75, जयस्वाल 55, सूर्यवंशी 31, हेटमायर 18, अवांतर 14, रबाडा 2-42), गुजरात जायंट्स 20 षटकांत 8 बाद 204 (साई सुदर्शन 73, बटलर 26, रशिद खान 24, रबाडा नाबाद 23, बिस्नॉई 4-41).

Advertisement
Tags :

.