महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानच्या चूरू खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजपला ठोकला रामराम

06:45 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

: उमेदवारी नाकारल्याने होते नाराज

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानात भाजपला मोठा झटका बसला आहे. राजस्थानच्या चूरूचे खासदार राहुल कस्वां यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कस्वा यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे.

काँग्रेस पक्षात सामील होण्याचा मी निर्णय घेतला आहे. माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांसमवेत अनेक मुद्दे राहिले आहेत. मतदारसंघातील लोकांचा आवाज ऐकत मी या पुढे देखील काम करत राहणार असल्याचे कस्वां यांनी म्हटले आहे.

कस्वां यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे आभार मानले आहेत. लोकांच्या भावनांचा विचार करत मी मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय कारणांमुळे मी भाजपचे सदस्यत्व आणि संसद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कस्वा यांनी या पोस्टमध्ये नमूद पेले होते.

भाजपने नाकारली होती उमेदवारी

भाजपने चूरू मतदारसंघात खासदार राहुल कस्वां यांना उमेदवारी नाकारली होती. पक्षाच्या या निर्णयावर कस्वां यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी कधीच पदाची लालसा बाळगली नाही. चूरू मतदारसंघाच्या विकासासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिलो आहे. तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली, यामागील कारणही मला सांगण्यात आले नाही असा दावा कस्वां यांनी केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article