For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

रत्नागिरीत स्पोर्ट्स टुरिझमला चालना देण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा पुढाकार; स्टेडियमची केली पाहणी

03:59 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
रत्नागिरीत स्पोर्ट्स टुरिझमला चालना देण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा पुढाकार  स्टेडियमची केली पाहणी
Advertisement
रत्नागिरी : ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक क्रिकेट प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासह रत्नागिरी जिल्ह्यात स्पोर्ट्स टुरिझमला चालना देण्यासाठी राजस्थान रॉयल्सने पुढाकार घेतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या उच्च कार्यक्षमता केंद्राच्या पथकाने रविवारी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी केली. त्यानंतर या पथकाने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन क्रीडा विकासाबाबत चर्चा केली.

या भेटीदरम्यान रत्नागिरीतील ग्रामीण भागात असलेल्या गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याच्या विविध संधींवर चर्चा झाली.

Advertisement

या उपक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. राजस्थान रॉयल्ससारख्या नामांकित क्रिकेट संघटनेच्या सहकार्यामुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी राजस्थान रॉयल्सच्या उच्च कार्यक्षमता केंद्राचे संचालक व संघ व्यवस्थापक रोमी भिंडर, मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक चित्रे, उच्च कार्यक्षमता केंद्राचे प्रशिक्षक प्रशांत कांबळे आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

या उपक्रमामुळे रत्नागिरीतील क्रिकेटच्या विकासासोबतच जिल्ह्याला क्रीडा पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.